साखरवाडी गणेश पवार
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी यांच्या चौंडी येथील स्मारकाच्या धरतीवर सुभेदार श्रीमंत मल्हारराव होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या मुरूम ता फलटण येथे भव्य स्मारक उभारण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी श्रीमंत सुभेदार मल्हाराव होळकर 329 व्या जयंती निमित्त केले. जिल्हा परिषद सातारा, पंचायत समिती फलटण, अखिल महाराष्ट्र धनगर विकास संस्था, जयंती महोत्सव समिती व ग्रामपंचायत मुरूम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या सुभेदार श्रीमंत मल्हाराव होळकर यांच्या 329 व्या जयंती उत्सवात ते बोलत होते यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब डांगे पंचायत समितीचे सभापती विश्वजीत राजे नाईक निंबाळकर,श्रीमंत भूषणसिंह होळकर, माणिकराव सोनवलकर, नितीन शाहूराजे भोसले, सुनील तात्या भगत, रेखाताई खरात, पांडुरंग कचरे, गट विकास अधिकारी पठाण मॅडम, सागर कांबळे, संपतराव देवकाते, मुरूम गावच्या सरपंच प्रियंका बोंद्रे, उपसरपंच संतोष बोंद्रे ग्रामसेवक धायगुडे महादेव संकपाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरवातीला सुभेदार श्रीमंत मल्हाराव होळकर यांच्या पालखीचे गावांमधून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या हस्ते प्रतिमेचे व ध्वजाचे पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर सभा मंडपाचे भूमी पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले अनेक मान्यवरांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाच्या प्रारंभी शिवव्याख्याते अमोल खेसे देशमुख यांचे व्याख्यान झाले कार्यक्रमाचे प्रस्ताविक शंकर माडकर यांनी व सूत्रसंचालन प्रा रविंद्र टिळेकर यांनी केले.