शेतकरीकरी व सर्वसामान्यांची बँक अशी बँक ऑफ महाराष्ट्र ची ओळख --प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप...
साखरवाडीची वार्ताMarch 19, 2022
0
साखरवाडी गणेश पवार
बँक ऑफ महाराष्ट्र शाखा साखरवाडी ही बँक शेतकरी,सर्वसामान्य नागरिक व व्यापारी यांची बँक म्हणून तालुक्यात ओळख असून बँकेने विश्वास दाखवून केलेल्या अर्थसहाय्याने साखरवाडी व पंचक्रोशीतील शेतकरी व अनेक छोटे-मोठे व्यवसायिक यांची यशस्वी वाटचाल सुरू असून भविष्यात बँकेने आपल्या कार्य क्षेत्रातील शेतकरी व व्यापारीवर्गावर असाच विश्वास दाखवून अर्थसहाय्य करावे असे आवाहन फलटणचे उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा साखरवाडीच्या नवीन जागी स्थलांतर कार्यक्रमाप्रसंगी केले. तब्बल 50 वर्षांपासून साखरवाडी मध्ये ग्राहक सेवा देत असलेल्या बँकेचे स्थलांतर भवानी माता मंदिराशेजारी बाजार तळ येथे झाले असून सदर कार्यक्रमाला बॅंकेचे सरव्यवस्थापक सूर्यकांत सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, साखरवाडी चे माजी सरपंच विक्रमसिंह भोसले, डी के पवार,संजय भोसले, बँक ऑफ महाराष्ट्राचे विभागीय अंचल प्रबंधक विवेक नाचणे, उपविभागीय अंचल प्रबंधक श्रीकृष्ण झेले उपस्थित होते.यावेळी सूर्यकांत सावंत म्हणाले,साखरवाडी शाखेने तळागळातील शेतकरी,सर्वसामान्य नागरीक,महिला बचत गट, कामगार वर्ग यांच्या विश्वासावर बँकेची आज पर्यंतची वाटचाल केली असून भविष्यात अधिकाधिक परिसरातील लहान घटकांपर्यंत पोहोचण्याचा बँकेचा प्रयत्न राहील.यावेळी साखरवाडी चे माजी सरपंच विक्रमसिंह भोसले, महानंदा दूध डेअरी चे डी के पवार, संजय भोसले, राजेंद्र भोसले, पोलीस कॉन्स्टेबल मोहन हंगे,ए एस आई विलास यादव, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष उमाकांत भोसले उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाखा व्यवस्थापक दिपारानी गवळी यांनी केले तर आभार उप शाखा व्यवस्थापक रमेश बोडा यांनी मानले यावेळी परिसरातील नागरीक, व्यापारी,महिला बचत गटाच्या महिला बहुसंख्येनेसुद्धा उपस्थित होत्या.