विक्रमसिंह (आप्पा) भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त साखरवाडी येथे रक्तदान शिबीरास उस्फुर्त प्रतिसाद..
साखरवाडीची वार्ताMarch 15, 2022
0
विक्रमसिंह (आप्पा) भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त साखरवाडी येथे रक्तदान शिबीरास उस्फुर्त प्रतिसाद..
साखरवाडी गणेश पवार
साखरवाडी ता फलटण येथे साखरवाडी-पिंपळवाडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व विद्यमान सदस्य विक्रम सिंह भोसले (अप्पा) यांच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त साखरवाडी,पिंपळवाडी,होळ सर्कल येथील तरुण मंडळांचे कार्यकर्ते व सरपंच ग्रुप साखरवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तरुण युवक व महिला वर्गाने रक्तदान शिबीरास प्रतिसाद देत सुमारे 100 जणांनी 'रक्तदान हेच श्रेष्ठ दान' या उक्तीला अनुसरून रक्तदान केले. मागील कोरोना काळात रक्ताची तीव्र टंचाई झाली होती आता सुद्धा हॉस्पिटलमध्ये दाखल असणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना रक्त मिळवण्यासाठी ओढाताण करावी लागते ही रक्तताची हीच टंचाई लक्षात घेत व वाढदिवसाच्या कार्यक्रमाला इतर वायफळ खर्चाला फाटा देत रक्तदान शिबिर आयोजित केल्याने सर्वच स्तरातून आयोजकांचे कौतुक होत आहे.
यावेळी विक्रम सिंह भोसले आप्पा यांना फोनवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर(बाबा) व समक्ष भेटून फलटण तालुक्याचे जेष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे-पाटील, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुभाष शिंदे, साखरवाडी ग्रामपंचायत उपसरपंच अक्षय रुपनवर, महानंदा दूध डेअरी चे व्हाईस चेअरमन डी के पवार, माणिक आप्पा भोसले, सुरेश पवार, हिरालाल पवार, तानाजी गायकवाड, शरद जाधव हवालदार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक तालुकाध्यक्ष दादा जाधव यांच्यासह साखरवाडी व फलटण तालुक्यातील सामाजिक,राजकीय,शैक्षणिक क्षेत्रातील बहुसंख्य मान्यवरांनी विक्रमसिंह भोसले अप्पा यांना शुभेच्छा दिल्या.