विक्रमसिंह भोसलेंवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे कौतुक...ह भ प निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर
साखरवाडीची वार्ताMarch 14, 2022
0
विक्रमसिंह भोसलेंवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे कौतुक...ह भ प निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर
साखरवाडी गणेश पवार
विक्रमसिंह भोसले यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्य कर्त्यांचे कौतूक वाटते.अतिशय कमी कालावधीमध्ये कार्यक्रमाचे नेटके नियोजन करून आज पर्यंतचा माझा या भागातील सर्वात मोठा जन समुदाय असणारा हा कीर्तनाच्या कार्यक्रमाचे नियोजन केले असे गौरवोद्गार महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार ह भ प निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांनी काढले.साखरवाडी ता फलटण येथील माजी सरपंच व विद्यमान सदस्य विक्रमसिंह पांडुरंग भोसले यांच्या उद्या दि 15 रोजी होणाऱ्या 50 व्या अभिस्टचिंतनाच्या अनुषंगाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी काढले यावेळी साखरवाडीसह तालुक्यातील प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता.संयोजकांनी केलेल्या नेटक्या नियोजनाचे यावेळी सर्वांनी कौतुक केले.