होळ विकास सोसायटी चेअरमनपदी निवृत्ती भोसले यांची निवड...
साखरवाडीची वार्ताMarch 28, 2022
0
साखरवाडी गणेश पवार
फलटण तालुक्यातील बहुचर्चित होळ विकास सोसायटी च्या चेअरमनपदी राष्ट्रवादी राजे गटाच्या निवृत्ती सर्जेराव भोसले यांची तर व्हाईस चेअरमनपदी विठ्ठल बोबडे यांची निवड झाली असून नवनिर्वाचित चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचे अभिनंदन महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन रघुनाथराजे नाईक निंबाळकर, पंचायत समितीचे सभापती विश्वजीत राजे नाईक निंबाळकर, महानंदा दूध डेअरी चे व्हाईस चेअरमन डी के पवार, पंचायत समितीचे माजी सभापती शंकरराव माडकर श्रीराम साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन नितीन शाहू राजे भोसले,संजय भोसले, पंचायत समिती माजी सदस्य सागर कांबळे, ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र भोसले, पैलवान संतोष भोसले, सुरेश भोसले यांनी अभिनंदन केले.