सुरवडी ता फलटण येथील पवार मळा या छोट्याशा 25 उंबऱ्याच्या वस्तीमध्ये लोकसहभागातून कुलस्वामिनी डोंगराई देवी चे अतिशय सुबक व आकर्षक मंदिर कोणत्याही शासकीय योजनेचा फायदा न घेता येथील पवार कुटुंबीयांनी उभारले असून नुकताच या मंदिरांमध्ये मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला. गावांमध्ये देव देवतांचे मंदिर उभारण्यापासून त्या मंदिराच्या सभामंडपासह इतर सर्व गोष्टींसाठी लागणाऱ्या खर्चासाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदार किंवा खासदार फंडासाठी गावकऱ्यांना पाठ पुरावा करावा लागत असतो परिणामी निवडणूक तोंडावर काही गावात किंवा वाड्यावस्त्यावर मतदानावर वर डोळा ठेवून विविध घोषणा करीत राजकीय पुढारी सभामंडप किंवा मंदिर उभारणीच्या घोषणा करीत असतात. मात्र पवारमळा(सुरवडी) याठिकाणी उभारलेल्या मंदिरासाठी कोणत्याही शासकीय किंवा राजकीय लाभ न घेता अवघा 25 उंबऱ्याच्या छोट्याशा वस्तीने लोकसहभागातून कुलस्वामिनी श्री डोंगराई देवीचे अतिशय सुबक मंदिर उभारले असून त्या मंदिरामध्ये मूर्ती प्राण प्रतिष्ठापना व कलशारोहन लोणी भापकर चे पांडुरंग महाराज यांच्या हस्ते कार्यक्रम नुकताच अतिशय उत्साहात पार पडला यावेळी या वस्तीवरील पोलीस पाटील संतोष पवार, सुरवडी विकास सोसायटीचे विद्यमान संचालक मोहन पवार,माजी व्हा. चेअरमन दौलत पवार, र, सतीश पवार, भगवान पवार,विश्वास पवार, संदीप नलवडे,गबन पवार,राजेंद्र ना पवार,जगन्नाथ पवार,प्रशांत पवार,रामदास पवार व विघ्नहर्ता गणेश तरुण मंडळाचे सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.