साखरवाडीची सुकन्या माधुरी जाधवची उपनिरीक्षक पदी निवड
साखरवाडीची वार्ताMarch 27, 2022
0
साखरवाडी गणेश पवार
साखरवाडी (होळ सर्कल ) येथील माधुरी दशरथ जाधव हिची नुकत्याच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या जाहीर झालेल्या निकालांमध्ये पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली असून तिच्या या निवडीने साखरवाडी परिसरातील सर्व क्षेत्रातील मान्यवरांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या माधुरी हिचे शालेय शिक्षण साखरवाडी माध्यमिक विभाग साखरवाडी या ठिकाणी तर महाविद्यालयीन शिक्षण मुधोजी हायस्कूल फलटण या ठिकाणी झाले लहानपणापासून अभ्यासाची आवड असल्याने जिद्द व चिकाटीच्या जोरावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात ती यशस्वी झाले असून तिच्या उपनिरीक्षक पदी झालेल्या निवडीने साखरवाडी व परिसरातील अनेकांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.