साखरवाडीचे माजी सरपंच विक्रमसिंह भोसले यांच्या वाढदिनी विविध कार्यक्रम..
साखरवाडीची वार्ताMarch 12, 2022
0
रसाखरवाडी गणेश पवार
साखरवाडी ता फलटण गावचे माजी सरपंच व विद्यमान सदस्य विक्रमसिंह पांडुरंग भोसले यांच्या सोमवार दि 15मार्च रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन नवरात्र शारदा उत्सव होळ सर्कल,शंभू महादेव मंडळ होळ सर्कल,सरपंच ग्रुप साखरवाडी,मनाचा पहिला सार्वजनिक गणपती गणेशोत्सव मंडळ साखरवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने महा रक्तदान शिबिर आयोजित केले असून ते विक्रम सिंह भोसले यांच्या निवास्थानी दि 15 रोजी सकाळी 10.30 ते 5.30 या वेळेत होणार असून विक्रमसिंह भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 14 मार्च रोजी सायंकाळी 5 ते 7 यावेळेत ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे किर्तन साखरवाडी विद्यालय माध्यमिक विभाग शाळेच्या मागील बाजूच्या पटांगणात होणार असल्याचे माहिती संयोजकांनी दिली.