साखरवाडी गणेश पवार
सुरवडी ता फलटण गावचे सुपुत्र प्रमोद राजाराम जगताप यांची नुकत्याच जाहीर झालेल्या एमपीएससीच्या निकालांमध्ये पी एस आय पदी निवड झाली असून पीएसआय पदी निवड झाल्याने त्यांच्यावर सुरवडी सह परिसरांमधून कौतुकाचा वर्षाव होत आहे. सर्वसामान्य कुटुंबांमध्ये 1992 साली जन्मलेल्या प्रमोद जगताप यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा सुरवडी येथे माध्यमिक शिक्षण साखरवाडी विद्यालय साखरवाडी येथे तर 12 वी पर्यंतचे शिक्षण टी सी कॉलेज बारामतीमध्ये झाले असून त्यांनी B E. मेकॅनिकल झिल काॅलेज पुणे येथे केले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेत ते 2019साली पास झाले होते मात्र कोरोना महामारीमुळे शारिरीक परीक्षा डिसेंबर 2021 रोजी घेण्यात आली त्यामध्ये पास झाल्याने त्यांची पी एस आय म्हणून निवड झाली.प्रमोद जगताप यांचे वडील राजाराम सदाशिव जगताप हे प्राथमिक शिक्षक म्हणून निवृत्त झाले असून घरातूनच शिक्षणाचे बाळकडू लहानपणापासून मिळाल्याने व कठोर, खडतर परिश्रमाच्या जोरावर तिसऱ्याच प्रयत्नात त्यांनी हे यश संपादन केले असून त्यांच्या यशाने त्यांच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Congratulations 💐
ReplyDelete