साखरवाडी
ग्राहक पंचायत मार्फत केले जाणारे कार्य ग्राहक हिताचे व कौतुकास्पद असून ग्राहक पंचायतीमार्फत भविष्यात अधिक अधिकाधिक ग्राहकांना न्याय मिळावा व त्यांच्या तक्रारीचा निपटारा व्हावा अशी अपेक्षा उपविभागीय अधिकारी डॉ शिवाजीराव जगताप यांनी फलटण येथे उपविभागीय कार्यालयात झालेल्या बैठकीत व्यक्त केली. सदर बैठकीमध्ये मध्ये ग्राहक पंचायत व ग्राहकांसाठी येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाययोजना ह्या विषयी चर्चा झाली चर्चेसाठी ग्राहक पंचायतीच्या जिल्हा अध्यक्षा सुनिता राजे घाडगे,जिल्हा माहिती प्रमुख आर के जाधव, सल्लागार किसनराव भोसले ग्राहक पंचायत सातारा सचिव सोमनाथ माघाडे, संघटक किरण बोळे ग्राहक पंचायतीचे जिल्हा समिती सदस्य घनवट,ऍड देवकाते उपस्थित होते. ग्राहक पंचायतीचे निकाली काढलेल्या तक्रारीबद्दल ऍड देवकाते यांचा डॉ जगताप साहेबांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व ग्राहक पंचायतीच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी ग्राहक पंचयातच्यावतीने घाडगे यांनी उपविभागीय अधिकारी डॉ शिवाजी जगताप यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले.