फलटण :फलटण येथील बंधन बैंक लि या बँकेमध्ये रिलेशनशिप ऑफिसर म्हणून नोकरीस असलेला समाधान भिमराव वजाळे वय २३ वर्ष , सध्या रा . स्वामी विवेकानंदनगर , बी . एस . एन . एल . ऑफिसच्यासमोर बंधन बँक रेसिडन्स , फलटण मुळ रा . माळीनगर , अकलुज , ता माळशिरस , जि सोलापूर स्वतः दरोड्याचा बनाव रचित बँकेच्या कलेक्शनचे सुमारे ७४ हजार रुपये हडपून स्वतः दि २२ रोजी फलटण ग्रामीण पोलीस ठाणे येथे येऊन तक्रार दिली होती मात्र पोलीस तपासात विसंगती आढळल्याने तक्रारच दरोडेखोर असल्याचे निष्पन्न झाले असून फलटण ग्रामीण पोलीस स्थानकातुन मिळालेल्या अधिक माहितीनुसार व समाधान वजाळे याने दिलेल्या फिर्यादीनुसार म्हटले होते की,दि २२रोजी दुपारी १.१५ वा चे सुमारास तो बंधन बँकेच्या कलेक्शनचे ७३.४६५ / - रुपये घेऊन अलगुडेवाडीहुन गोखळी गावच्या दिशेने जात असताना दोन मोटार सायकलींवरुन आलेल्या चौघाजणांनी त्यांचा पाठलाग करुन खटकेवस्तीजवळील चव्हाणपाटी येथे मागून येऊन त्याच्या डोळ्यात चटणीची पुड टाकुन त्याचेकडील ७३.४६५ / - रुपये रोख रक्कम जबरदस्तीने चोरून नेली आहे . समाधान भिमराव वजाळे यांनी वरीलप्रमाणे हकिकत सांगितल्यावर त्यांचे तक्रारीवरून फलटण ग्रामीण पोलीस ठाणे गु . र . नं . १२२ / २०२२ भा . दं . सं कलम ३ ९ ४ ३४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी स . पो . नि . अक्षय सोनवणे , स . पो . नि . दत्तात्रय दराडे व पो . उ . नि . सागर अरगडे यांचे नेतृत्वाखाली तीन पथके तयार करुन त्यांना तपासकामी सूचना देऊन रवाना केले . सकाळ पो . नि . मा . धन्यकुमार गोडसे सो यांच्या सूचनांनुसार तक्रारदार समाधान भिमराव वजाळे यांनी दाखविलेल्या घटनास्थळाला भेट देऊन तपासाची दिशा निश्चित करुन त्यादृष्टीने तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरु केला . त्यामध्ये तक्रारदार यांनी चोरट्यांनी त्यांचा ३ कि . मी . पर्यंत पाठलाग केल्याचे तक्रारीत सांगितले आहे . परंतु त्यांचे मोटार सायकलला आरसे नसल्याचे दिसून आले . यावरुन तक्रारदार काहीतरी लपवत असल्याचा संशय आल्यामुळे पुन्हा तक्रारदार यांचेकडे तपासामध्ये समोर आलेल्या वरील मुद्द्यांबाबत विचारपूस केली असता तो उलटसुलट माहिती सांगु लागला त्यावेळी त्यास पोलीसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली देऊन सांगितले की , दि . २२/०२/२०२२ रोजी सकाळपासून दुपारपर्यंत बंधन बँकेच्या गोळा केलेल्या कर्जाच्या हप्त्यांची रोख रक्कम ७३,४६५ / - रुपये हडप करण्याच्या दृष्टीने त्याचा गावाकडील मित्र महंम्मद हमीद नदीफ मोमीन वय २२ वर्ष , रा . कांतीगल्ली , अकलुज , ता . माळशिरस , जि . सोलापूर यास फलटणमध्ये बोलावुन घेतले होते . त्यानंतर दोघांनी दरोड्याचा बनाव करण्याचा प्लॅन केला . त्यामध्ये ठरल्यानुसार महंम्मद हमीद नदीफ मोमीन हा पैसे घेऊन गेल्यानंतर त्याने जवळच्याच एका गावातील किराणा दुकानातून चटणीची पुड विकत घेऊन ती स्वतःचे डोळ्यावर टाकल्याचा बनाव करुन फलटण ग्रामीण पोलीस ठाणेस खोटी तक्रार दिली होती.प्रस्तुत गुन्ह्याचे तपासामध्ये तक्रारदार यांचेसह त्यांचा साथीदार असलेल्या महंम्मद हमीद नदीफ मोमीन यास अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून गुन्हा करताना त्यांनी वापरलेले दोन मोबाईल हॅण्डसेट व एक मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे . पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे हे करीत आहेत.