होळ विकास सोसायटीची निवडणूक बिनविरोध.
साखरवाडी गणेश पवार
फलटण तालुक्यातील बहुचर्चित होळ विकास सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाली असून राजे गटाच्या 13 पैकी 13 जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत विरोधातील उमेदवारांनी सर्वचे सर्व उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने सदरची निवडणूक बिनविरोध झाली असून सर्व नवनिर्वाचित संचालकांचे अभिनंदन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी अभिनंदन केले