भाडळी ता फलटण येथे जुगार अड्डयावर छापा
फलटण
भाडळी ता फलटण येथे शनिवार दिनांक 5 रोजी सर्जेराव दादा माने यांच्या मालकीच्या इमारतीमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्डयावर फलटण ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून 4 लाख 37,940/-रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून जुगार अड्डा चालकासाहित पाच जणांना अटक करण्यात आली आहे. फलटण ग्रामीण पोलीस स्थानकातुन मिळालेल्या अधिक माहितीनुसार,मौजे भाडळी, ता फलटण या ठिकाणी बेकायदेशीर पत्याच्या जुगार अड्डयावर फलटण ग्रामीण पोलिसांनी छापा टाकला असता यामध्ये 4,37,940,/- रुपयाचा मुद्देमाल जप्त केला असून यामध्ये ६ मोटार सायकली, ५ टेबल, २५ खुर्च्या व ८ स्टुल असा जुगाराचा माल जप्त करण्यात आला असून क्लब चालक माऊली शिवरकर रा फलटण व मालक सनी काकडे रा फलटण यांच्यावर जुगार कायदा कलम 4, 5 अन्वये विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून दाखल गुन्ह्यामध्ये सुनिल मोतीराम पवार रा बुधवार पेठ फलटण, जमन तारु पंडीत रा येरवडा पुणे, योगेश यशवंत खरात रा पणदरे ता बारामती,आतीश सुभाष साळवे रा पणदरे ता बारामती, सोमनाथ सिताराम घनवट रा जाधववाडी ता फलटण, यांना अटक करण्यात आले आहे व जॉनटी रा.पणदरे ता बारामती, माऊली बिवरकर ,सनी काकडे सर्जेराव दाद माने हे फरार झाले आहेत.सदर गुन्ह्याची फिर्याद पोकॉ गणेश अवघडे यांनी दिली असून पुढील अधिक तपास पोउपनि आरगडे करीत आहेत.