साखरवाडीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर आश्रम शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
साखरवाडी (गणेश पवार)
प्रजासत्ताक दिना निमित्त साखरवाडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आश्रम शाळेचे ध्वजारोहन प्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्रमुख पाहुणे शकील सिकंदर मनेर फलटण तालुका उपाध्यक्ष व शहराध्यक्ष सचिन खानविलकर यांच्या हस्ते पार पडला
डॉ.बाबासाहेब आंबेडकर आश्रम शाळेला स्वाभिमानी चे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्या मार्फत सर्वतोपरी मदत केली जाईल असे आश्वासन धनंजय महामुलकर यांनी दिले तसेच शकील मणेर यांनी शाळेच्या स्वयंपाकासाठी लागणारे साहित्य दिले याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक जाधव सर यांनी आभार मानले
यावेळी स्वाभिमानी पक्ष फलटण तालुका अध्यक्ष दादा जाधव,उपाध्यक्ष रोहन मोहिते,मयूर सोनवणे,गौरव आटक,अजित जाधव तसेच शाळेचे सचिव हरीष गायकवाड तसेच शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.