सुरवडी विकास सोसायटीची निवडणूक बिनविरोध..
स्थापनेपासूनची बिनविरोधची परंपरा राखली कायम
साखरवाडी (गणेश पवार)
स्थापनेपासून आपली बिनविरोधची परंपरा कायम राखत सुरवडी विकास सोसायटीची सण २०२२ ते २००२७ कालावधी साठीची निवडणूक बिनविरोध पार पडली असून तालुक्याचे ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा नेते माजी पंचायत समिती सदस्य धनंजय दादा साळुंखे- पाटील यांच्या नेतृत्वाखाली १३ पैकी १३ उमेदवार विरोधात कोणाचाही उमेदवारी अर्ज न आल्याने बिनविरोध निवडून आले. निवडून आलेले नवनिर्वाचित सदस्य सर्वसाधारण पुरुषांमध्ये पवार अशोक बबन, साळवे रणजीत नामदेव, साळुंखे उमेश दत्तात्रय, पवार मोहन संपत, जगताप काशिनाथ विठोबा, जगतप रमेश मारुती, साळुंखे संपत माणिक, साळुंखे धनंजय प्रल्हाद, सर्वसाधारण महिला जगताप आलका नारायण, साळुंखे जोत्स्ना धनंजय, अनुसूचित जाती-जमाती मधून मोहिते शांतीलाल दादू ,विजा/भज/विमा प्रवर्गामधून धायगुडे पोपट बबन, इतर मागास वर्गामधून कुंभार मुरलीधर बिनविरोध निवडून आले असून निवडणूक अधिकारी म्हणून श्रीमती एस पी कुलकर्णी यांनी काम पाहिले.
नवनिर्वाचित सदस्यांचा सुरवडीचे सरपंच जितेंद्र साळुंखे पाटील व साखरवाडीचे माजी सरपंच विक्रम सिंह भोसले यांनी हार व पुष्पहार घालून सत्कार केला.