साखरवाडीच्या शेतकरी कामगार पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध
चेअरमन पदी धनंजय साळुंखे-पाटील तर व्हाईस चेअरमनपदी सुरेश भोसले यांची निवड
साखरवाडी (गणेश पवार)
शेतकरी कामगार ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित साखरवाडी तालुका फलटण या पतसंस्थेची सन 2021- 22 ते 20 26- 27 या कालावधीसाठी ची संचालक पदाची निवडणूक बिनविरोध झाली असून नवनिर्वाचित संचालकांमध्ये सर्वसाधारण पुरुष साळुंखे प्रल्हाद गोविंदराव सुरवडी, साळुंके धनंजय प्रल्हादराव सुरवडी, सासानानी विष्णू मुरजमल साखरवाडी, भोसले सुरेश गणपत साखरवाडी, साळुंके रवींद्र बाबुराव सुरवडी, पवार शितल सुरेश साखरवाडी, सर्वसाधारण महिलांमध्ये पवार मनीषा सुरेंद्र फलटण, भोसले मेघा अनंत साखरवाडी, शेवाळे मेघा राजेंद्र साखरवाडी, अनुसूचित जाती जमाती मधून गायकवाड सागर शिवराम साखरवाडी,वि मा प्रवर्ग मधून जाधव ज्ञानू दादा सुरवडी, इतर मागासवर्गीय वर्गामधून जगताप विजय सिताराम सुरवडी यांची बिनविरोध निवड झाली असून संस्थेच्या चेअरमनपदी साळुंखे धनंजय प्रल्हादराव तर व्हाईस चेअरमनपदी भोसले सुरेश गणपत यांची सर्वानुमते निवड झाली असून नवनिर्वाचित संचालक, चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचे हार व पुष्प गुच्छ देऊन तालुक्याचे ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांनी सत्कार केला व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी सुरवडी ग्रामपंचायतचे सरपंच जितेंद्र साळुंखे-पाटील उपसरपंच दिपक साळुंखे पाटील सदस्य संतोष साळुंखे उपस्थित होते.