सामाजिक कार्याबद्दल साखरवाडी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक आश्रम शाळा यांच्यावतीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर व फलटण तालुका उपाध्यक्ष शकील सिकंदर मणेर यांच्या कार्याचा उचित गौरव करीत सन्मानपत्र देऊन सन्मानित केले.व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सत्काराच्या वेळी धनंजय महामुलकर म्हणाले, दिलेल्या सन्मानाने आणि मी भारावून गेलो असून येणाऱ्या काळात माझ्याकडून अधिकाधिक समाजउपयोगी कामे करून गोर गरीब, शेतकरी व कष्टकऱ्यांच्या न्याय हक्कसाठी निश्चित लढत राहीन. यावेळी उपस्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर आश्रम शाळेचे सचिव हरीश गायकवाड, मुख्याध्यापक जाधव सर आणि शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष दादासाहेब जाधव शिक्षक कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती