फलटण तालुक्यातील रिक्तपोलीस पाटीलपदाची आरक्षण सोडत १७ रोजी- उपविभागीय अधिकारी डॉ शिवाजीराव जगताप
साखरवाडी(गणेश पवार)
सातारा जिल्ह्यातील सर्व उपविभागीय स्तरावर रिक्त पोलीस पाटील संवर्गातील रिक्त पदे भरणेच्या अनुषंगाने संपूर्ण सातारा जिल्ह्यात एकाच वेळेस भरती प्रक्रिया राबविण्याबाबतचा सुधारित कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे . त्याअनुषंगाने तहसीलदार फलटण यांचे दालनात फलटण तालुक्यातील पोलीस पाटील पद रिक्त असलेल्या गावांसाठी पोलीस पाटील सरळसेवा भरतीकामी १०० बिंदूनामावली व प्रवर्गनिहाय लोकसंख्येच्या अनुषंगाने येणाऱ्या प्रवर्गनिहाय आरक्षणामधून ३० % महिला आरक्षण सोडत गुरुवार , दि . १७ फेब्रुवारी , २०२२ रोजी सकाळी ठीक ११.०० वा . आयोजित करणेत आली असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी डॉ शिवाजीराव जगताप यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.