Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शालेय जीवनातील मैत्रीला 20 वर्षानंतर उजाळा.. तब्बल वीसवर्षांनतरच्या भेटीने विद्यार्थ्यांसह गुरुजनसुद्धा झाले भावुक..

 शालेय जीवनातील मैत्रीला 20 वर्षानंतर उजाळा..



तब्बल वीसवर्षांनतरच्या भेटीने विद्यार्थ्यांसह गुरुजनसुद्धा झाले भावुक..

साखरवाडी  गणेश पवार

शालांत परीक्षा पास होऊन मार्च 2002 मध्ये  बाहेर पडलेल्या माजी विद्यार्थी व विद्यार्थिनीचा स्नेहमेळावा साखरवाडी शिक्षण संस्थेच्या साखरवाडी विद्यालय साखरवाडी माध्यमिक विभागांमध्ये नुकताच पार पडला. तब्बल वीस वर्षानंतर एकत्रित आलेले विद्यार्थी व गुरुजन  यांना  एकमेकांना भेटून जुन्या आठवणीने प्रत्येकाचा ऊर भरून आला व  नकळत प्रत्येकाच्याच डोळ्याच्या कडा ओलावल्या गेल्या.सन१९९५ ते २००२ या कालावधीमध्ये पाचवी ते दहावीमध्ये शिक्षण घेऊन दहावी नंतर बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेमध्ये यायला सुमारे वीस वर्षाचा काळ लोटला  या 20 वर्षांच्या काळामध्ये प्रत्येकजण राजकीय, शैक्षणिक ,व्यावसायिक,सामाजिक क्षेत्रामध्ये तर कोणी नोकरी मध्ये रममाण झाला होता. आताच्या सोशल मीडियाच्या माध्यमांमुळे आपण एकत्रित येऊन स्नेहमेळावा आयोजित करू असे काही माजी विद्यार्थ्यांनी ठरवले व आपल्या जुन्या मित्र-मैत्रिणींना तसे निरोप सोशल मीडियाच्या माध्यमातून धाडले. त्यानुसार तारीख व वेळ ठरवण्यात आली ठरलेल्या तारखेच्या दिवशी सर्वांनी शाळेमध्ये एकत्र येऊन आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला व संपूर्ण दिवस शाळेच्या आवारात सवंगड्यांसोबत घालवला.         


    यावेळी प्रत्येकाने आपले मनोगत व्यक्त केले यामध्ये शाळेचे माजी मुख्याध्यापक चांगण सर यांनी आपल्या मनोगतात म्हटले, जीवनामध्ये माणसाला जशी अन्न, वस्त्र निवारा या तीन मूलभूत गोष्टींची आवश्यकता असते तशीच प्रत्येक माणसाला आपल्या जीवनामध्ये मित्रांची आवश्यकता असून आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत प्रत्येकाने आपली मैत्री  जपली पाहिजे मित्रांबरोबर आपले सुखदुःख प्रत्येकाला वाटता आले पाहिजेत. यामुळे सर्वांनी वर्षातून किमान एक वेळा तरी आपल्या जुन्या सवंगड्यांना आवर्जून भेटले पाहिजे व अशा स्नेहमेळाव्याचे कार्यक्रम झाले पाहिजेत.

 यावेळी प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांनी सुद्धा  आपली ओळख करून देत आत्ताच्या घडीला आपण करीत असलेल्या क्षेत्राची माहिती सांगत शाळा सोडून वीस वर्ष झाली एकमेकांना भेटायची इच्छा आम्हाला स्वस्थ बसून देत नव्हती यामुळे इथून पुढे वर्षातून 

 एक वेळा आम्ही अशा स्नेहमेळाव्याचे आयोजन नक्की करणार असा निश्चय करीत बालपणातील आपल्या जुन्या आठवणीनां उजाळा देऊन  शालेय जीवनातील किस्से सांगून कार्यक्रमांमध्ये रंगत आणली व पुढच्या वर्षी नक्की भेटू असे म्हणून एकमेकांचा निरोप घेतला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शैलेश कुमठेकर यांनी केले व आभार गणेश पवार यांनी मांडले.



प्रत्येकाने वर्षातून  एक दिवस आपल्या शाळेतील जुन्या मित्र मैत्रिणी साठी राखून ठेऊन शाळेमध्ये वर्षातून एकदा येऊन स्नेहमेळावा आयोजित करायचा असा निर्धार सर्वांनी यावेळी केला



अन.. साऱ्यांच्याच डोळ्यांच्या कडा ओलावल्या..

कार्यक्रमासाठी माजी विध्यार्थीनींची उपस्थिती थोडी उशिरा झाली मात्र वीस वर्षानंतर शिक्षक व विध्यार्थ्यांना  समोर बघून त्यांचा अश्रूंचा बांध फुटला हे बघून उपस्थित सर्वांच्याच डोळ्याच्या कडा ओलावल्या


.

Post a Comment

4 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी ,खूप छान नियोजन केले मित्रांनो

    ReplyDelete
    Replies
    1. उरलेल्या दिवसात वर्षातून एकदा भेटायचं एवढ नक्की

      Delete
    2. मैत्री हसणारी असावी मैत्री चिडवणारी असावी प्रत्येक क्षणाचा आनंद धेणारी असावी एकवेळेस ती भांडणारी असावी पण कधीच बदलणारी नसावी

      Delete