साखरवाडी गणेश पवार
साखरवाडी तालुका फलटण येथे दि . १ ९ फेब्रुवारी२२ महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व संतशिरोमणी नरहरी महाराज यांच्या जयंती निमित्ताने साखरवाडी पिंपळवाडी येथील सुवर्णकार समाज बांधवांच्या सहकार्याने सुशांत राजेंद्र वेदपाठक यांच्या विद्यानगर येथील ' कृपासिंधु ' निवासस्थानी मान्यवरांच्या शुभहस्ते संतश्रेष्ठ नरहरी महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने प्रतिमेचे पुजन पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात झाली . विठ्ठल प्रासादिक भजनी मंडळ पिंपळवाडी , स्वामी समर्थ भजनी मंडळ ५ सर्कल यांनी उत्कृष्ठ भजन सेवा केली ठिक १२ वाजता संतश्रेष्ठ नरहरी महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेवर उपस्थित भाविक व समाजबांधवामार्फत पुष्पवर्षाव करून महा आरती करण्यात आली . संपूर्ण परिसर छत्रपती शिवाजी महाराज व नरहरी महाराजांच्या जयजयकाराने गजबजून उठला . संतश्रेष्ठ नरहरी महाराज यांच्या जीवनचरित्रावर समाजातील रविंद्र वैदपाठक यांनी लिहलेल्या ' श्रीसंत नरहरी महाराज चरित्रामृत ' या पुस्तीकेचा प्रकाशन सोहळा फलटण तालुक्याचे जेष्ठ पत्रकार व महाराष्ट्र राज्य ग्राहक पंचायतीचे जेष्ठ सल्लागार किसनराव भोसले ( काका ) , जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष खानविलकर नाना, महाराष्ट्र राज्य प्रवाशी महासंघाचे सचिव सोमनाथ माघाडे , ह भ प किसनराव वेदपाठक महाराज, प्रकाश पवार महाराज , दिक्षित सर या मान्यवरांच्या शुभहस्ते पार पडला . सदर कार्यक्रमास ग्राहकपचायतीचे डॉ . विशाल नाळे ,गणेश फडतरे , उमेश बावकर , दासा राऊत , जे . डी . जाधवसर , दिवटे गुरुजी , चोपडेसर , वाघमोडे सर , अरविंद भोसले सर , फडतरे सर , फलटण तालुका भजनी मंडळ अध्यक्ष नामदेव गायकवाड , जिल्हा खादी ग्रामोद्योग ( फलटण विभाग ) संचालक दादासो रणदिवे , तसेच समाज बांधव , शिवप्रेमी बांधवांची मोठ्या प्रमाणात हजेरी होती . स्नेहभोजनानंतर उपस्थितांचे जेष्ठ नागरिकांच आभार संस्थेचे दिक्षित सर यांनी संत नरहरी महाराज यांच्या चरित्राविषयी माहिती सांगुन केली.