नीरा उजवा कालव्यामध्ये 5 सर्कल येथे अज्ञात पुरुषाचा मृतदेह
साखरवाडी (गणेश पवार)
5 सर्कल (खामगाव) ता फलटण येथून वाहणाऱ्या नीरा उजवा कालव्यामध्ये पाच सर्कलच्या स्मशानभूमीजवळ कालव्याच्या पाण्यामध्ये अज्ञात इसमाचा मृतदेह पाण्याच्या मध्यावर तरंगताना दिसत आहे. मृतदेह पाण्याच्या मधोमध तरंगत असल्याने दगड बांधून सदर इसमाने आत्महत्या केली आहे की कोणी घातपात करून पाण्यामध्ये टाकले आहे? असा संशय नागरिक उपस्थित करत आहेत.