फलटण चौफेर दि २५ डिसेंबर २०२५
फलटण नगपरिषद निवडणुकीत भाजप,राष्ट्रवादी काँग्रेस व इतर मित्र पक्ष (महायुतीला) मिळालेल्या अभूतपूर्व यशाचे शहरातील मतदार बांधव-भगिनींचे आभार मानण्यासाठी महायुतीच्या वतीने जाहीर आभार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. नव-निवडीत नगराध्यक्ष व नगरसेवकांचा हा सन्मान सोहळा नामदार जयकुमार गोरे (ग्रामीण विकास मंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या हस्ते तर आमदार सचिन पाटील,माजी खा रणजितसिंह नाईक निंबाळकर जेष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.हा जाहीर नागरी सत्कार समारंभ आज सायंकाळी ठीक 6 वाजता फलटण येथील गजानन चौक येथे आयोजित करण्यात आला आहे. फलटण शहरातील नागरिकांनी दिलेल्या भरभरून पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.या कार्यक्रमास फलटण शहरातील सर्व नागरिकांनी या जाहीर आभार मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

