फलटण चौफेर | दि. १६ डिसेंबर २०२५ |
सकाळी ६.०० वाजता मिळालेल्या माहितीनुसार नीरा खोऱ्यातील प्रमुख चार धरणांमधील एकूण पाणीसाठा समाधानकारक असून तो ९४.१७ टक्क्यांवर आहे.भाटघर धरणामध्ये एकूण २३.१९१ टीएमसी क्षमतेपैकी ८९४ मिमी पर्जन्यमान असून सध्या धरण ९८.६८ टक्के भरले आहे. धरणातून जलविद्युत गृह व सांडव्याद्वारे पाणी सोडलेले नाही.निरादेवघर धरणामध्ये ११.५७७ टीएमसी पाणीसाठा असून धरण ९८.७० टक्के भरले आहे. येथेही कोणतीही पाण्याची आवक अथवा विसर्ग नाही.वीर धरणात सध्या ७.०७३ टीएमसी पाणीसाठा असून धरण ७५.१८ टक्के भरले आहे. या धरणातून सांडवा किंवा एस्केपद्वारे पाणी सोडण्यात आलेले नाही. नीरा डावा कालवा (एनएलबीसी) ४७७ क्युसेक्स तर नीरा उजवा कालवा (एनआरबीसी) १४५२ क्युसेक्स वेगाने सुरू आहे.
गुंजवणी धरणात ३.६६७ टीएमसी पाणीसाठा असून धरण ९९.३८ टक्के भरले आहे. येथेही पाण्याची आवक व विसर्ग शून्य आहे. नीरा खोऱ्यातील या चारही धरणांमध्ये एकूण पाणीसाठा ४५.५१० टीएमसी इतका असून तो ९४.१७ टक्के आहे. मागील वर्षी याच कालावधीत हा साठा ४३.६७५ टीएमसी म्हणजेच ९०.३७ टक्के इतका होता. यामुळे यंदा नीरा खोऱ्यातील पाणीसाठा मागील वर्षाच्या तुलनेत अधिक असल्याचे चित्र आहे.

