फलटण चौफेर दि २० डिसेंबर २०२५
फलटण नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज शांततेत मतदान प्रक्रिया सुरू असून सकाळी ७.३० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत एकूण ३५.४८ टक्के मतदान झाले आहे. सुरुवातीच्या तासांत मतदारांमध्ये उत्साह दिसून आला असून महिला मतदारांचा सहभागही लक्षणीय आहे.फलटण नगरपरिषदेत एकूण ४५ हजार ५१४ मतदार असून त्यामध्ये २२ हजार २९१ पुरुष व २३ हजार २१७ महिला मतदार आहेत. सकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत ३ हजार ३११ मतदारांनी (७.२७%) आपला मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये १,९२५ पुरुष व १,३८६ महिला मतदारांचा समावेश आहे.त्यानंतर ७.३० ते ११.३० या कालावधीत मतदानाचा टक्का वाढत ९ हजार ३४७ मतदारांनी (२०.५४%) मतदान केले. यामध्ये ५,०१६ पुरुष आणि ४,३३१ महिला मतदारांनी मतदान केले.
सकाळपासून दुपारी १.३० वाजेपर्यंत एकूण १६ हजार १५० मतदारांनी मतदान केले असून त्यामध्ये ८,१८८ पुरुष व ७,९६२ महिला मतदारांचा समावेश आहे. एकूण मतदानाची टक्केवारी ३५.४८% इतकी नोंदविण्यात आली आहे.मतदान केंद्रांवर सुरळीत व्यवस्था ठेवण्यात आली असून कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने प्रशासन व पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात आहे. दुपारनंतर मतदानाचा टक्का आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

