फलटण चौफेर दि १६ डिसेंबर २०२५
सोनवडी खुर्द ता. फलटण येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषीदुतानी ग्रामीण जागरूकता कृषि कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२५- २०२६ कार्यक्रमाअंतर्गत एकात्मिक तण व्यवस्थापन सबंधित मार्गदर्शन केले. कृषीदुतान मार्फत वाढत्या तणांचा प्रादुर्भाव लक्षात घेता त्यांपासून होणाऱ्या आतोनात नुकसानीस बळी न पडता एकात्मिक तन व्यव्थापनाचे तंत्र अंगिकृत करणे काळाची तसेच आर्थिकदृष्टया फायद्याचे ठरते यामध्ये तन नियंत्रणाचे पद्धती जसे की जैविक, रासायनिक,भौतिक, इत्यादींचा समावेश होतो. यातून पर्यावरणाचा समतोल राखला जातो, आणि पद्धतशीर तन नियंत्रण केले जाते. यावेळी गणपत सोनवलकर,राम हरी सोनवलकर ,अक्षय सोनवलकर, आबा पवार , मोरे मामा ,रोहित सोनवलकर,व तसेच इतर शेतकरी उपस्थित होते. यासाठी कृषी महाविद्यालय फलटणचे प्राचार्य डॉ. यु. डॉ. चव्हाण सर, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर कार्यक्रम समन्वयक प्रा. निलिमा धालपे मॅडम, कार्यक्रम अधिकारी प्रा. सुरेश साळुंखे, प्रा. नितिशा पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीदुत अदित्य कणसे,अदित्य साबळे, ऋतुराज पाटील,कुणाल काशीद, रोहित वाबळे,विश्वजित साळुंखे, सोमनाथ ढोपे ह्यांनी प्रात्यक्षिक करून दाखवले.
