फलटण चौफेर दि १० डिसेंबर २०२५
फलटण तालुक्यातील सासकल येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी सलग्न व फलटण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषिदुतांनी 'ग्रामीण जागरूकता कृषि कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२५-२६" कार्यक्रमांतर्गत दिले शेतकऱ्यांना जीवामृत निर्मीती बद्दल प्रशिक्षण.
या कार्यक्रमा अंतर्गत कृषीदूतांनी जीवामृत बनविण्याचे प्रशिक्षण दिले. जीवामृत हे गायीचे शेण, गोमूत्र, गूळ, बेसन आणि सजीव मातीपासून बनवलेले नैसर्गिक द्रव खत आहे, जे मातीची सुपीकता वाढवते आणि पिकांची वाढ सुधारते.या कार्यक्रमाला गावकरी, शेतकरी, तरुण कार्यकर्ते तसेच महिलांचा भरपुर प्रतिसाद मिळाला.
कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू.डी. चव्हाण, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.डी. निंबाळकर , कार्यक्रम समन्वयक प्रा. एन. एस. धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. एम. साळुंखे, प्रा. एन. ए. पंडित, यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदूत गौरव भोसले, श्रेयश शिंगाडे, तेजस शिंदे, स्वरूप चव्हाण, सुमित शेवाळे, आदित्य पवार, श्रीराज मांजरकर, प्रसाद मुळीक यांनी हा उपक्रम पार पडला.
