फलटण चौफेर दि १० डिसेंबर २०२५
ग्रामीण जागरूकता कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२५-२६ कार्यक्रमांतर्गत फलटण एज्युकेशन सोसायटीचे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त कृषी महाविद्यालय फलटण येथील कृषिदूतांचे सोनवडी खुर्द येथे मान्यवरांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले. या वेळी गावचे सरपंच माननीय श्रीमती. शालन लालासाहेब सोनवलकर, उपसरपंच माननीय श्री. दत्तात्रय माणिक चव्हाण , सामाजिक कार्यकर्ते श्री. अक्षय सोनवलकर, जि.प.प्रा. शिक्षक श्री.मयूर बनसोडे, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक तसेच प्रगतशील शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामीण जागरूकता कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प कार्यक्रमांतर्गत पुढील १० आठवड्यांमध्ये राबवण्यात येणाऱ्या शेतीविषयक प्रात्यक्षिक, गटचर्चा, जनावरांचे लसीकरण, वृक्षारोपण, शेतकरी शास्त्रज्ञ चर्चा इत्यादी कार्यक्रमाविषयी थोडक्यात कृषिदूतांकडून माहिती देण्यात येणार आहे. कृषी महाविद्यालय फलटणचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण , श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय फलटणचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर , समन्वयक प्रा. एन. एस. ढालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. एम. साळुंखे, प्रा. एन. ए. पंडित, प्रा जी .बी.अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदूत आदित्य कणसे, आदित्य साबळे, कुणाल काशिद, ऋतुराज पाटील, रोहित वाबळे, विश्वजीत साळुंखे, सोमनाथ ढोपे हे विविध कार्यक्रम राबवणार आहेत, तसेच शेतकऱ्यांचे अनुभव, त्यांच्या शेती पद्धतीचा सखोल अभ्यास करणार आहेत.
