फलटण चौफेर दि १६ डिसेंबर २०२५
दुधापासून बनविण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या पदार्थांपैकी एक पदार्थ म्हणजे कलाकंद. दुध व त्यापासुन बनवणारे विविध पदार्थ कसे बनवायचे व ते जास्त काळ कसे टिकवता येतील याची संपुर्ण माहिती कृषीकन्यांनी प्रात्यक्षिकांसह सांगवी येथील महिलांना समजावून सांगितली. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महिलांनी विद्यार्थिनींचे कौतुक केले.महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न फलटण एज्युकेशन सोसायटी फलटण संचलित कृषी महाविद्यालय, फलटण येथील शेवटच्या वर्षातील कृषी कन्यांनी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम आणि कृषी औद्योगिक संलग्नता उपक्रम २०२५-२६ अंतर्गत कलाकंद बनवण्याचे प्रात्यक्षिक देऊन गावातील स्त्रियांना प्रशिक्षित केले आहे. कृषीकन्या सना शेख, भाग्यश्री जाधव, श्रद्धा राऊत, पुजा सरक, प्राजक्ता सस्ते, सानिका गोफणे यांनी हा कार्यक्रम राबवला. कार्यक्रमासाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कार्यक्रम अधिकारी प्रा. एन. ए. पंडित, कार्यक्रम समन्वयक प्रा. एन. एस. धालपे, AIA प्रमुख प्रा. जी. बी. अडसुळ, प्रा. एस. एम. साळुंखे, विषय विशेषज्ञ प्रा. आर. डी. नाईकवाडी यांचे मार्गदर्शन लाभले.
