फलटण चौफेर दि १९ ऑक्टोबर २०२५
श्री स्वयंभू दत्त मंदिर खामगाव (साखरवाडी)चे मठाधिपती, पंच दशनाम जुना आखाडा १६ मढी आखाड्याचे श्रीमंत उमेशानंद पुरीजी महाराज यांच्या गाणगापूर येथे नव्या मठाच्या स्थापनेचे भूमिपूजन मोठ्या भक्तीभावाने संपन्न झाले. या प्रसंगी ऋषिकेश येथील सेक्रेटरी श्रीमहंत दयानंद पुरीजी महाराज, हरिद्वारचे थानापती महंत देवेंद्र पुरीजी महाराज, नागाबाबा महंत अगरवीर पुरीजी महाराज, नागाबाबा महंत इलायची पुरीजी महाराज, नागाबाबा महंत जगदीश पुरीजी महाराज व नागाबाबा महंत अवधूत पुरी महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती.
गाणगापूर येथील अष्टतीर्थांपैकी एक असलेल्या विश्रांती कट्टा या पवित्र स्थळी हा मठ उभारण्यात येत असून, हेच ते ठिकाण आहे जिथे श्रीगुरू नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी विश्रांती घेतली होती, असे गुरुचरित्राच्या ४६ व्या अध्यायात उल्लेख आहे.भक्तांना व संतांना सर्व सोयी-सुविधांनी सुसज्ज असा मठ उभारण्याचे नियोजन उमेशानंद पुरीजी महाराजांनी केले असून, सध्या प्रारंभीक टप्प्यात भक्तांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.गाणगापूर ग्रामपंचायतीचे सरपंच दत्तू हेरूर यांनी विश्रांती कट्ट्याच्या जीर्णोद्धाराची जबाबदारी उमेशानंद पुरीजी महाराजांना दिली असून, लवकरच येथे श्रीगुरू नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या मूर्तीची स्थापना केली जाणार आहे.दररोज येथे माधवगीरी व अन्नछत्र सुरु करण्यात आले असून, सर्व भक्तांना मठ आणि जीर्णोद्धार या दोन्ही उपक्रमांचा लाभ घेता येईल, असे सूचित करण्यात आले आहे.“दत्त महाराजांच्या आशीर्वादाने सर्व काही शक्य आहे,” असे भावपूर्ण उद्गार श्री उमेशानंद पुरीजी महाराजांनी या प्रसंगी काढले.

