फलटण चौफेर दि १९ ऑक्टोबर २०२५
मुरूम (ता. फलटण) येथे खासदार गटामार्फत नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा म्हणून फराळ व भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम माजी खासदार श्री रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या संकल्पनेतून तर तालुक्याचे आमदार सचिन पाटील व ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील (तात्या) यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला
.या वेळी गावातील अनेक कुटुंबांना दिवाळी फराळ वाटप करून सणासुदीच्या दिवसांमध्ये आनंद वाटण्यात आला. कार्यक्रमास गावचे उपसरपंच संतोष बोंद्रे, तंटामुक्ती अध्यक्ष रमेश बोंद्रे, ग्रामपंचायत सदस्य बाळकृष्ण बोंद्रे, पराग बोंद्रे, ज्येष्ठ नागरिक विठ्ठल शिंदे, युवराज बोंद्रे, अक्षय संकपाळ, नितीन बोंद्रे, नारायण बोंद्रे तसेच खासदार गटातील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.या सामाजिक उपक्रमामुळे गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी खासदार गटाच्या या उपक्रमाचे कौतुक केले.


