साखरवाडी पुढारी वृत्तसेवा
साखरवाडी ता.फलटण येथे श्रीदत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कारखान्याच्या सन २०२५/२६ चा गाळप हंगामाच्या मोळी पूजनाचा कार्यक्रम श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष महंत विद्वांस श्याम सुंदरशास्त्री यांच्या हस्ते व कंपनीचे संचालक चेतन धारू यांच्या उपस्थित अतिशय उत्साही वातावरणात पार पडला.यावेळी आगामी हंगामात १२ लाख टन गाळपाचे उद्धिष्ट असून यासाठी लागणारी तोडणी व वाहतूक यंत्रनेची सर्व तयारी पूर्ण झाली असून शासन निर्णयानुसार गळीत हंगाम सुरू करणार आहे एनसीएलटी च्या माध्यमातून ६ वर्षांपूर्वी घेतलेल्या कारखान्याचे विस्तारवाढीचे काम पूर्ण झाले असून पूर्वीचा ३५०० हजार मेट्रिक टन गाळप क्षमता असलेला कारखाना यावर्षी ६५०० ते ७००० हजार मेट्रिक टनाने गाळप करणार असून तालुक्यातील व तालुक्याबाहेरील कार्यक्षेत्रातील ऊसाचे गाळप वेळेत होण्यास यामुळे मदत होणार असल्याचे कारखान्याचे प्रशासकीय अधिकारी अजितराव जगताप यांनी यावेळी सांगितले.
श्रीदत्त इंडिया ही कंपनी अल्पावधीत शेतकऱ्यांना उसाच्या चोख पेमेंटमुळे पसंतीस उतरली असून शेतकऱ्यांनी आपला सर्व ऊस कारखान्यात घालण्याचे आवाहन सुद्धा त्यांनी यावेळेस केले. कार्यक्रमाला पं स माजी सभापती शंकराव माडकर , श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन नितीन भोसले , केन मॅनेजर सदानंद पाटील , सुरज बांदल , नितीन होले, यश ठाकूर, फलटण तालुका साखर कामगार युनियनचे राजेंद्र भोसले , पोपट भोसले ,पै संतोष भोसले , राजेंद्र गायकवाड, केन यार्ड इन्चार्ज एस के भोसले ,ट्रान्सपोर्ट इन्चार्ज नितीन भोसले ,ग्रा प सदस्य मच्छिंद्र भोसले,सुरक्षा अधिकारी अजय कदम, सुरेश नाना भोसले,संजय जाधव, मातोश्री कंट्रक्शन चे संजय भोसले, फलटण राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सतीश माने,जयराम नाना भोसले,सुरेश भोसले,महादेव बोंद्रे कारखान्याचे सर्व अधिकारी, कामगार व ऊसउत्पादक शेतकरी उपस्थित होते.



