फलटण चौफेर दि २२ ऑक्टोबर २०२५
हिंगणगाव व तरडगाव परिसरातील नागरिकांसाठी विकासाचा नवा टप्पा सुरू झाला आहे. आज माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या शुभहस्ते विविध रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन संपन्न झाले.
या कार्यक्रमांतर्गत हिंगणगाव-आदर्की बु ते हिंगणगाव पांढरेची वस्ती रस्ता (५ कोटी) व तरडगाव ते सुळ वस्ती रस्ता (५ कोटी) या दोन प्रमुख रस्त्यांसाठी एकूण १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, या कामांना आजपासूनच प्रारंभ करण्यात आला आहे.या प्रसंगी बोलताना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, “फलटण तालुक्यात सर्वत्र गुणवत्ता असलेले रस्त्यांचे जाळे उभारण्याचा आमचा संकल्प आहे. गावोगावी विकासकामे पोहोचवण्यासाठी आवश्यक निधी महायुती सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येईल.”कार्यक्रमास युवा नेते अमरसिंह नाईक निंबाळकर, माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, विलासराव नलवडे, राजाभाऊ काकडे, किरण जाधव, सुरेश भोईटे, अतुल गायकवाड, आदित्य गायकवाड, प्रशांत गायकवाड, रमेश भोईटे, अमित रणवरे, शुभम नलवडे, सचिन पोळ, संतोष सुळ, बापू निंबाळकर, दत्तराज नाईक निंबाळकर यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.


