फलटण चौफेर दि १६ सप्टेंबर २०२५
फलटण नगरपालिकेच्या मुख्याधिकारीपदी निखिल जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर विद्यमान मुख्याधिकारी निखिल मोरे यांची बदली पुणे येथे उपायुक्तपदी झाली आहे.नवीन मुख्याधिकारी म्हणून पदभार स्वीकारणारे निखिल जाधव यांना यापूर्वी विविध प्रशासकीय क्षेत्रांत काम करण्याचा अनुभव असून त्यांच्या कार्यकाळात फलटण नगरपालिकेच्या कामकाजाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.दरम्यान, निखिल मोरे यांनी फलटण येथे कार्यरत असताना विविध विकासकामे आणि प्रशासकीय निर्णय राबवले होते. त्यांच्या बदलीनंतर नगरपालिकेत नवीन नेतृत्वाकडून जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत.