सातारा (जिमाका)दि. २२ ऑगस्ट २०२५
जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-२०२५ च्या अनुशंगाने प्रभागाच्या भौगोलिक सिमा निश्चित करण्याचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. शासन निर्देशानुसार सातारा जिल्हा परिषद व ११ पंचायत समितीची प्रारुप प्रभाग रचना दि. १४ जुलै २०२५ रोजी प्रसिध्द करणेत आलेली आहे.
तसेच राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्या दि.१२ ऑगस्ट २०२५च्या आदेशानुसार प्रभाग रचनेस अंतिम मान्यता देण्याबाबत दिलेल्या सुचनानुसार विभागीय आयुक्त पुणे विभाग पुणे यांनी त्यांच्याकडे प्राप्त होणा-या अंतिम प्रभाग रचनेस दि. २० ऑगस्ट २०२५ रोजी मान्यता दिलेली आहे.
महाराष्ट्र शासनाने सातारा जिल्हा परिषद निवडणूक विभाग व ११ पंचायत समिती निर्वाचक गणाची अंतिम प्रभाग रचना दि.२२ ऑगस्ट २०२५ रोजी शासन राजपत्रात प्रसिध्द करण्याबाबत आदेशीत केलेले आहे.
त्याअनुशंगाने सातारा जिल्हा परिषद निवडणूक विभाग व ११ पंचायत समिती निर्वाचक गणाची अंतिम प्रभाग रचना दि.२२ ऑगस्ट २०२५ रोजी संबंधित तहसिल कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, जिल्हा परिषद सातारा, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच सातारा जिल्ह्याचे अधिकृत संकेतस्थळ satara.nic.in वर सर्वसामान्यांना पहावयास उपलब्ध केलेले आहे. असे
उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण यांनी कळविले आहे.