फलटण चौफेर दि२२ ऑगस्ट २०२५ - चौधरवाडी फलटण येथे कृषी महाविद्यालयातील चतुर्थ वर्षातील विद्यार्थिनींनी शेतकऱ्यांना माती परिक्षणाचे प्रात्यक्षिक करून दाखविले. जमिनीची सुपीकता जपण्यासाठी सातत्याने माती परीक्षण करावे,याबाबत माहिती दिली.पिकाच्या वाढीसाठी आवश्यक घटकांची पूर्तता जमिनीतून होत असते. त्यासाठी योग्य खत नियोजन करताना माती परीक्षण अहवालाचा लाभ होतो. माती परीक्षणातून उपलब्ध नत्र, स्फुरद, पालाश, सूक्ष्मअन्नद्रव्ये, सेंद्रिय कर्ब, जमिनीतील क्षारांचे प्रणाम आदीची माहिती मिळते याबाबत शेतकऱ्यांना सविस्तर माहिती दिली. पीक काढल्यानंतर किंवा पेरणीपूर्वी तीन महिन्यांनी मातीचा नमुना पाठवावा. जमिनीची एकरूपता, रंग, सुपीकता, खडकाळपणा, उंच सखलपणा लक्षात घेऊन वेगवेगळे भाग पाडून ५ ते १८ नमुना गोळा करावे.नमुना कसा घ्यावा आणि कोणती काळजी घ्यावी याही विशेष माहिती दिली. आदी विविध बाबींची माहिती यावेळी देण्यात आली.कार्यक्रमासाठी कृषीमहाविद्यालयाचे कृषिकन्या कुमारी जाधव सृष्टी हनुमंत,लडकत श्रेया संजय, कांबळे प्रणोती सुनील, मलगुंडे प्रतीक्षा संजय, कदम रोहिणी लक्ष्मण, काटकर स्नेहा संजयकुमार,कांबळे सानिका अमोल यांनी हे प्रात्यक्षिक राबविले. कार्यक्रमासाठी कृषी महाविद्यालय फलटणचे प्राचार्य डॉ. यू.डी. चव्हाण सर ,कार्यक्रम अधिकारी प्रा. सुरेश साळुंखे व प्रा.नितीशा पंडित, कार्यक्रम समन्वयक प्रा. निलिमा धालपे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.