फलटण चौफेर दि १६ ऑगस्ट २०२५
साखरवाडी परिसरात इक्षुदंड या नावाने सुरू झालेले हे हॉस्पिटल आणि त्यातील डॉक्टर चव्हाण हे या क्षेत्रातील तज्ञ असून एम बी बी एस मेडिसिन डिप्लोमा झालेले असून या परिसरातील रुग्णांनी या त्यांच्या इक्षुदंड हॉस्पिटलचा फायदा घ्यावा असे आवाहन फलटण तालुक्याचे ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील (तात्या ) यांनी केले आहे १५ ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर साखरवाडी येथील बस स्थानकाजवळ डॉक्टर बाळासाहेब राऊत एमबीबीएस ऑर्थोपेडिक सर्जन यश मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल अँड आय सी यु खामगाव साखरवाडी यांच्या विद्यमाने इक्षुदंड हॉस्पिटलचे उद्घाटन प्रल्हादराव साळुंखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले
यावेळी महानंद डेअरीचे माजी उपाध्यक्ष डि के पवार,प सं माजी सभापती शंकरराव माडकर,माजी सरपंच विक्रमसिंह भोसले,प सं माजी सदस्य सागर कांबळे, सुरवडीच्या सरपंच सौ शरयू जितेंद्र साळुंखे पाटील,माजी सरपंच माणिक आप्पा भोसले, सुरेश दादा भोसले,माजी उपसरपंच अक्षय रुपनवर, राहुल सोनटक्के मान्यवर उपस्थित होते पाटील म्हणाले, ग्रामीण भागात एमडी मेडिसिन सारखे डॉक्टर येणे ही एक अपवादात्मक गोष्ट आहे म्हणून या परिसरातील जनतेला शहरात उपचार घेण्यासाठी जाण्याची गरज भासणार नाही आपल्याच गावात चांगले उपचार डॉक्टर चव्हाण व डॉक्टर राऊत यांच्या माध्यमातून मिळतील असे सांगून या हॉस्पिटलला भविष्यात आमचे काही सहकार्य लागल्यास ते देण्याचा आमचा प्रयत्न राहील असे साळुंखे पाटील यांनी शेवटी सांगितले
या परिसरातील दुकाने व दवाखाने आणि व्यावसायिक बाजारपेठ चालण्यासाठी या भागातील रस्ते सुधारले तर बाजारपेठ चांगली चालेल असे मत महानंद डेअरीचे उपाध्यक्ष डि के पवार यांनी यावेळी आपल्या भाषणात सांगितले लोकांचे आरोग्य ठणठणीत ठेवण्यासाठी या परिसरातील धुळीचे प्रदूषण नियंत्रित ठेवले पाहिजे असे मत डॉक्टर बाळासाहेब राऊत यांनी यावेळी मांडले धुळी कणांनी या परिसरातील जनतेचे आयुष्य कमी कमी होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगून धुळीपासून बचाव केला तर मोठ्या आजारापासून बचाव होऊ शकतो असेही डॉक्टर राऊत त्यांनी यावेळी सांगितले साखरवाडी चा कारखाना आणि या भागातील मुबलक प्रमाणात असणारे उसाचे क्षेत्र ऊसाला संस्कृत मध्ये इक्षुदंड असे म्हटले असल्याने या हॉस्पिटलचे नाव इक्षुदंड देण्यात आले असल्याचे डॉक्टर विश्वनाथ चव्हाण यांनी सांगून आपल्या परिसरात या हॉस्पिटलच्या माध्यमातून केलेला प्रयत्न यशस्वी ठरेल आणि लोकांना चांगली सेवा चांगले उपचार आणि योग्य निदान देण्याचे काम या इक्षुदंड हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण करणार असल्याचेही डॉक्टर चव्हाण यांनी सांगितले यावेळी परिसरातील शेतकरी कामगार ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.