फलटण चौफेर दि २२ ऑगस्ट २०२५
भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने साखरवाडी ता फलटण येथे आज दि २२ रोजी सायंकाळी ६ वाजता एसटी स्टँड परिसरात दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जाणार आहे. येथील सरपंच ग्रुप, साखरवाडी यांच्या वतीने या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले असून या उत्सवाला माढा लोकसभेचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, फलटण कोरेगावचे आमदार सचिन पाटील, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील,श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर,सातारा जिल्हा राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर महानंदाचे माजी व्हाईस चेअरमन डि के पवार फलटण फलटण तालुक्यातील महायुतीचे सर्व पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती असणार असल्याचे माजी सरपंच विक्रमसिंह भोसले व उपसरपंच अक्षय रुपनवर यांनी सांगितलेभगवान श्रीकृष्णाची आकर्षक प्रतिमा, पारंपरिक पथकांचा जल्लोष आणि गोविंदांच्या गजरात हा उत्सव पार पडणार असून यावर्षीही "एकजुटीचा गोविंदा" हा संदेश देत साखरवाडीकरांनी तयारी सुरू केली आहे.
साखरवाडीत भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन
August 21, 2025
0