फलटण चौफेर दि २२ ऑगस्ट २०२५ -चौधरवाडी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित कृषी महाविद्यालय फलटण मधील चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांनी ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२५-२६ अंतर्गत किसान क्रेडिट कार्ड व पिक कर्ज याबद्दल माहिती सांगितली,
स्टेट बँक ऑफ इंडिया फलटण येथे भेट दिली. व शेतीविषयक कर्ज व पिक कर्ज योजनेबद्दल माहिती घेतली. कृषिकन्यानी कर्जाबद्दल जास्तीत जास्त शेतकऱ्यांना माहिती सांगितली. तेथे बैंक मॅनेजर गणेश पवार सर आणि बॅक कर्ज विषयी शेतकऱ्यांना माहिती दिली.कार्यक्रमासाठी कृषी महाविद्यालय फलटणचे प्राचार्य डॉ. यू.डी. चव्हाण सर ,कार्यक्रम अधिकारी प्रा. सुरेश साळुंखे व प्रा.नितीशा पंडित, कार्यक्रम समन्वयक प्रा. निलिमा धालपे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कृषीमहाविद्यालयाचे कृषिकन्या कुमारी जाधव सृष्टी हनुमंत,लडकत श्रेया संजय, कांबळे प्रणोती सुनील, मलगुंडे प्रतीक्षा संजय, कदम रोहिणी लक्ष्मण, कांबळे सानिका अमोल , काटकर स्नेहा संजयकुमार यांनी प्रात्यक्षिक घेतले.