Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

ब्रेकिंग बातमी! दालवडी येथे कारमधून गांजा व पिस्तूल जप्त



फलटण चौफेर, दि. २८ ऑगस्ट २०२५ – फलटण ग्रामीण पोलिसांनी दालवडी ता फलटण येथे कारमधून गांजा, पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली असून या प्रकरणात संशयित रविद्र कोलवडकर याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.



फलटण पोलिसांनी  दिलेल्या माहितीनुसार, दालवडी येथील फॉरेस्टजवळ रविद्र कोलवडकर यांच्या स्विफ्ट कार (क्र. MH-11-CW-4844) मधून तपासाअंती गांजा, एक पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे आढळून आली. याबाबत विचारणा केली असता कोलवडकर यांनी गाडीत ही सामग्री कशी आली याबाबत अनभिज्ञ असल्याचे सांगितले. तथापि, पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी कायदा तसेच आर्म्स अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.


या कारवाईत पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने, वैभव सुर्यवशी, अमोल जगदाळे, नितीन चतुरे, हनुमंत दडस, तात्या कदम, तानाजी ढोले, तुषार नलवडे व कल्पेश काशिद यांनी सहभाग घेतला. गुन्हा रजि. नं. ६१६/२०२५ एन.डी.पी.एस. अॅक्टप्रमाणे दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बदने हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.