फलटण चौफेर दि. १६ ऑगस्ट २०२५ फलटण शहरात रेस्ट हाऊस समोर, लक्ष्मीनगर येथे सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे.फलटण शहर पोलीस स्थानकातून मिळालेल्या माहितीनुसार, दि. १४ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ८ वाजता विशाल शेंडगे याने आपल्या ताब्यातील ट्रॅक्टर-ट्रॉलीवर जयशंकर डीजे साऊंड सिस्टीम लावून मोठ्या आवाजात वाद्य वाजवले. त्यामुळे परिसरात कर्णकर्कश आवाज पसरून सार्वजनिक शांततेचा भंग झाला. याशिवाय, वाहन रस्त्यावर धोकादायक पद्धतीने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण केला होता.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विक्रम कुंभार यांच्या फिर्यादीवरून फलटण शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. २७४/२०२५ भा.दं.वि. कलम २९२, २८५, २२३ व मुंबई पोलीस अधिनियम कलम ३८/१३६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या गुन्ह्याचा तपास महिला पोलीस हवाळदार माधवी बोडके, फलटण शहर पोलीस ठाणे या करीत आहेत.