Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

फलटणकरांसाठी आता रोजचा "स्वादोत्सव" देवत्व बेकर्सच्या मावा केकची फलटणमध्ये दमदार एन्ट्री

 




फलटण चौफेर दि १९ ऑगस्ट २०२५

साताऱ्यातील सुप्रसिद्ध देवत्व बेकर्सचा मावा केक आता फलटणकरांच्या सेवेत उपलब्ध झाला आहे. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कसबा पेठेतील बुरुड गल्ली येथे भक्ती एंटरप्रायजेस या केक शॉपीतून विक्रीला सुरुवात झाली. उद्घाटनावेळी पत्रकार बंधू उपस्थित होते.लाखोंच्या जीभेवर अधिराज्य गाजवणाऱ्या या खास मावा केकचा स्वाद घेताच फलटणकरांच्या तोंडून “व्वा! लई भारी!!”, “लाजवाब! सुपर्ब!!” असे उद्गार आपसूक उमटत होते.देवत्व बेकर्सचा मावा केक हा शुद्ध शाकाहारी, ड्रायफ्रूटसह समृद्ध असून वाढदिवस, लग्नसोहळा, पाहुणचार अशा सर्वच उत्सव-क्षणांत खवय्यांची पहिली पसंती ठरतो. सातारा, पुणे, मुंबई, कोल्हापूर, नाशिक यांसह देश-विदेशातही या केकने आपली चवदार छाप उमटवली आहे.



पहिल्याच दिवशी फलटणकरांनी तब्बल ३०० हून अधिक मावा केक विकत घेऊन ‘स्वादोत्सव’ाचा उच्चांकी प्रतिसाद नोंदवला.याचबरोबर, साताऱ्यातील सुप्रसिद्ध राजपुरोहित नमकीन उत्पादनांचीही प्रथमच फलटणमध्ये विक्री सुरू झाली असून फरसाण, बाकरवडी, लसूण शेव, पोहा-चिवडा यांचा आस्वादही नागरिकांना मिळू लागला आहे.



भक्ती एंटरप्रायजेसचे प्रो. प्रा. पत्रकार यशवंत खलाटे-पाटील यांनी सांगितले की, “आगामी काळात देवत्व बेकर्स व राजपुरोहित नमकीनचे दर्जेदार पदार्थ सातत्याने उपलब्ध राहतील.”

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.