Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

जावली येथील जवान देवदास रजपूत यांना वीरमरण



फलटण चौफेर दि २३ ऑगस्ट २०२५

जोधपूर राजस्थान येथे नर्सिंग असिस्टंट या पदावर भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले जावली (ता. फलटण) येथील नायक देवदास दिलीप रजपूत यांना गुरुवार दि. २१ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने वीरमरण आले. जवान देवदास रजपूत यांना कर्तव्यावर असताना हृदयविकाराच्या झटक्याने वीरगती प्राप्त झाल्याची बातमी त्यांच्या कुटुंबीयांना समजताच जावली गावासह फलटण तालुक्यावर शोक काळा पसरली आहे.

 देवदास रजपूत हे २०१७ मध्ये सैन्यामध्ये भरती झाले सैन्यात भरती झाल्यानंतर सुरुवातीला लखनऊ उत्तर प्रदेश येथे त्यांनी सैन्य दलाचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले. त्यांनी जम्मू व पुणे या ठिकाणी कर्तव्य बजावले आहे. सध्या ते जोधपूर राजस्थान येथे कर्तव्य बजावत होते.  २०१८ ला त्यांच्या वडिलांचे दुःखद निधन झाले. त्यानंतर त्यांनी कुटुंबीयांचा सांभाळ करत आपल्या भावंडांना शिकवले. देवदास रजपूत यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा जावली, माध्यमिक शिक्षण मुधोजी हायस्कूल फलटण येथे तर बीएससी मुधोजी महाविद्यालय येथे झाले. एमएससीची पदवी शिवाजी विद्यापीठातून त्यांनी पूर्ण केली. त्यांच्या पश्चात आई लता, पत्नी अमृता, शौर्य आणि वीर ही दोन मुले, महेश व अमर हे दोन भाऊ असा परिवार आहे.



अमर हा धाकटाभाऊ मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये कार्यरत आहे. देवदास राजपूत यांचे पार्थिव शुक्रवार दि. २२ रोजी पुणे येथे आणण्यात येणार आहे. त्या ठिकाणी सैन्य दलातर्फे मानवंदना देण्यात येणार आहे. रात्री उशिरा पार्थिव जावली ता. फलटण या त्यांच्या मूळ गावी आणण्यात येणार आहे. शनिवार दि. २३ रोजी सकाळी आठ वाजता जावली तालुका फलटण येथील गगनगिरी मठाशेजारी फलटण शिंगणापूर रस्त्यालगत असलेल्या जागेत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने व कुटुंबीयांनी दिली आहे. प्रशासनाने अंत्यसंस्काराची आवश्यक ती तयारी पूर्ण केली आहे. देवदास रजपूत यांच्या निधनाने संपूर्ण फलटण तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.