फलटण चौफेर दि ६ जुलै २०२५
साखरवाडी (ता. फलटण) - येथील साखरवाडी पोलीस दुरक्षेत्र व ग्रामपंचायत साखरवाडी येथे नुकतीच नव्याने निवड झालेल्या वरिष्ठ अधिकारी वर्गाची अभ्यास दौऱ्यानिमित्त भेट पार पडली. या दौऱ्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध प्रशासकीय पदांवर निवड झालेल्या अधिकाऱ्यांनी भेट दिली.
यामध्ये धनंजय बांगर (उपजिल्हाधिकारी), आशिष दहातोंडे (पोलीस उपअधीक्षक), सायली पाटील (सहाय्यक राज्यकर आयुक्त), विशाल मुळे (शिक्षणाधिकारी), ललित मोळे (सहाय्यक संचालक, वित्त व लेखा), राधिका चिमटे (महिला व बाल विकास अधिकारी) यांचा समावेश होता.
सदर अधिकाऱ्यांचे स्वागत साखरवाडी पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक दीपक पवार यांच्या हस्ते शाल, हार व श्रीफळ देऊन करण्यात आले. या प्रसंगी साखरवाडी ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच सौ. अपर्णा दत्तात्रय बोडरे प्रमुख उपस्थित होत्या.यावेळी ग्रामपंचायतीचे अधिकारी आढाव साहेब, माने साहेब, सौ. भोसले मॅडम, दत्तात्रय जगताप, उमेश तपासे,प्रदीप भोसले, प्रतीक गाडे व मान्यवर उपस्थित होते.हा सत्कार सोहळा उत्साही वातावरणात पार पडला. मान्यवरांनी नव्या अधिकाऱ्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.