फलटण चौफेर दि १६ जुलै २)२५ मुंबई येथे आमदार सचिन पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष मा. बाळासाहेब सोळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली नांदवळ व घिगेवाडी गावातील अनेक मान्यवरांनी व कार्यकर्त्यांनी राजे गटाला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये जाहीर प्रवेश केला.या कार्यक्रमात नांदवळ गावच्या सरपंच सौ. अरुणा बेस्के, उपसरपंच सचिन पवार, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश शिंदे, प्रकाश रासकर, राहुल ठोंबरे, सौ. संगीता भोसले, सौ. जयश्री भोसले, सौ. पुष्पा पवार यांच्यासह नांदवळ विकास सहकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन सूर्यकांत पवार, संचालक दत्तात्रय पवार, दत्तात्रय बबन पवार, रघुनाथ पवार, अभिमन्यू भोसले आदींनी पक्षप्रवेश केला.
तसेच घोगवडी गावचे सरपंच नारायण सावंत, माजी सरपंच आदिनाथ सावंत, घिगेवाडी विकास सहकारी सोसायटीचे चेअरमन धनसिंग सावंत, व्हाईस चेअरमन भरत घिगे, लक्ष्मण सावंत यांचा देखील पक्षप्रवेश करण्यात आला.या प्रसंगी पिंपोड सोसायटीचे चेअरमन सूर्यकांत निकम, प्रवीण निकम तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.