फलटण चौफेर दि २ जुलै २०२५
परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी फलटण तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक निलेश कापसे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
ही भेट संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या फलटण येथील मुक्कामाच्या पार्श्वभूमीवर पार पडली. पालखी मुक्कामी असताना राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी फलटण येथे येऊन वारकरी संप्रदायाबद्दल आपली आस्था व्यक्त केली आणि यानिमित्ताने निलेश कापसे व त्यांच्या परिवाराशी सदिच्छा भेट घेतली.
या भेटीत कापसे कुटुंबीयांसह विविध सामाजिक आणि ग्रामीण विकास विषयांवर सविस्तर चर्चा झाली. यावेळी उपस्थितांनी श्री साईबाबांचे पूजन करत राज्यमंत्री यांचे स्वागत केले. त्यांच्या सौजन्यपूर्ण व हसतमुख भेटीमुळे परिसरात आनंदाचे व उत्साही वातावरण निर्माण झाले होते.