फलटण चौफेर दि १६ जुलै २०२५
निरा खोऱ्यात मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या दमदार पावसामुळे प्रमुख धरणांमध्ये पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. १६ जुलै रोजी सकाळी ६ वाजेपर्यंतच्या नोंदीनुसार, भाटघर, निरा देवघर, वीर व गुंजवणी या चार धरणांमध्ये एकूण साठा ३८.३३४ टीएमसी (७९.३२%) इतका झाला आहे. गतवर्षी याच दिवशी हा साठा केवळ १७.०२२ टीएमसी (३५.२२%) होता.
धरणवार पर्जन्यमान व साठा (१६ जुलै २०२५): भाटघर :पाऊस – २० मिमीएकूण साठा – १९.६८६ टीएमसी (८३.७६%)इनफ्लो – +४५१, निरा देवघर :पाऊस – ४५ मिमीएकूण साठा – ७.३६३ टीएमसी (६५.३३%)इनफ्लो – +३७५,वीर धरण :पाऊस – ८ मिमीएकूण साठा – ८.४७० टीएमसी (९०.०३%)इनफ्लो – +४३३पाणी सोडणे – एकूण १४०० क्यूसेक्सनि रा डावा कालवा ६०० व निरा उजवा काळव्यामधून १२९९ क्यूसेक्सकने पाणी सुरू आहे गुंजवणी :पाऊस – ४१ मिमीएकूण साठा – २.५१३ टीएमसी (६८.११%)इनफ्लो – +१०३पाणी सोडणे – २५० क्यूसेक्स
एकूण इनफ्लो (४ धरणे) : १.३६२ टीएमसी
निरा खोऱ्यातील सध्याची पावसाची स्थिती समाधानकारक असून, सिंचनासाठी आणि पिण्यासाठी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास येत्या काही दिवसांत शंभर टक्के साठा होण्याची शक्यता आहे.