Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

निरा खोऱ्यातील धरणांमध्ये ७० टक्के पाणीसाठा मागील वर्षीच्या तुलनेत तिप्पट




फलटण चौफेर दि ८ जुलै २०२५

 निरा खोरे प्रकल्पातील चारही मुख्य धरणांमध्ये यंदा समाधानकारक पाऊस झाल्यामुळे पाणीसाठा लक्षणीयरीत्या वाढलेला आहे. ८ जुलै रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार भाटघर, नीरा देवघर, वीर आणि गुंजवणी या चारही धरणांमध्ये मिळून एकूण ३४.०८७ टीएमसी म्हणजेच ७०.५३ टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी केवळ ११.०८५ टीएमसी (२२.९४%) इतकाच साठा होता.



भाटघर धरण परिसरात ८ मिमी पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत एकूण ४२७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या धरणात १६.९७३ टीएमसी इतका साठा असून, तो क्षमतेच्या ७२.२२ टक्के आहे. धरणात ६६० क्युसेक्स इतकी आवक सुरू असून सध्या वीज निर्मिती प्रकल्प बंद आहे.



नीरा देवघर धरणात आज १९ मिमी पावसाची नोंद झाली असून एकूण पर्जन्यमान ९५८ मिमीवर पोहोचले आहे. सध्या या धरणात ६.४१६ टीएमसी इतका साठा असून, तो धरण क्षमतेच्या ५२.७० टक्के इतका आहे. येथे ३०३ क्युसेक्स आवक सुरू असून वीज निर्मिती बंद आहे.



वीर धरणात सध्या पावसाची नोंद नाही. मात्र या धरणात एकूण पर्जन्यमान १४५ मिमी असून साठा ७.९८४ टीएमसी म्हणजेच ८४.८७ टक्के झाला आहे. आवक ७८५ क्युसेक्स आहे. धरणातून सध्या ९ हजार क्युसेक्स इतका विसर्ग सुरू असून त्यामध्ये १४०० क्युसेक्स Escape व ४२०२ क्युसेक्स Spillway चा समावेश आहे. याशिवाय कालव्यांद्वारे निरा डावा कालव्यातून ६०० क्युसेक्स व उजव्या कालव्यातून १२०४ क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.



गुंजवणी धरण क्षेत्रात आज २७ मिमी पावसाची नोंद झाली असून एकूण पर्जन्यमान १२३१ मिमी झाले आहे. सध्या गुंजवणी धरणात २.७१२ टीएमसी (७३.५१%) इतका साठा असून, २४७ क्युसेक्स इतकी आवक सुरू आहे. धरणातून एकूण ३०३० क्युसेक्सचा विसर्ग सुरू असून त्यामध्ये २५० क्युसेक्स वीज निर्मितीसाठी व २७८० क्युसेक्स Waste weir द्वारे पाणी सोडले जात आहे.चारही धरणांमध्ये मिळून आज एकूण २.२३४ टीएमसी इतकी पाण्याची आवक झाली आहे. प्रशासनाने पाणीसाठ्याचे योग्य नियोजन सुरू ठेवले असून नदीकाठच्या गावांना सुरक्षिततेच्या दृष्टीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.