फलटण चौफेर दि ८जुलै २०२५
फडतरवाडी ता. फलटण येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न फलटण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कृषी महाविद्यालयातील सातव्या सत्रातील कृषीकन्यांनी दिले आंब्याचा जाम बनवण्या बद्दल प्रात्यक्षिक यात त्यांनी सांगितलं की आंब्याचा जाम बनवण्यासाठी, आपल्याला पिकलेले आंबे, साखर, लिंबाचा रस आणि पाणी लागेल. प्रथम, आंबे सोलून त्याचे लहान तुकडे करा. मग, ते मिक्सरमध्ये बारीक करून प्युरी बनवा. प्युरीमध्ये साखर आणि लिंबाचा रस घालून चांगले मिक्स करा. हे मिश्रण जाड होईपर्यंत शिजवा. तयार झाल्यावर, गरम असतानाच स्वच्छ, निर्जंतुक केलेल्या बरणीत भरा आणि थंड झाल्यावर झाकण लावा. अशी माहिती त्यांनी तेथील स्त्रियांना व ग्रामस्थांना दिली यासाठी कृषीकन्या अश्विनी महानवर, पायल नाळे,वैष्णवी चांदगुडे , निधी कोडापे, आविष्का शिंदे, प्रचिती कुदळे, सेजल दांगट यांनी हा कार्यक्रम राबवला .या कार्यक्रमा साठी
कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कार्यक्रम समन्वयक प्रा. निलिमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. नितिशा पंडित, प्रा. रश्मी नाईकवडी कृषी अभियांत्रिकी विषय मार्गदर्शक यांचा मार्गदर्शनाखाली हे प्रात्यक्षिक पार पडले.