फलटण चौफेर दि ३ जुलै२०२५
नांदल, ता. फलटण येथील एका शेतकऱ्याच्या उभ्या ऊसाच्या शेताला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची घटना ३० जून रोजी दुपारी १२ ते १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या आगीत अंदाजे दोन ते अडीच लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, पीडित शेतकरी सचिन सुदाम कोळेकर यांनी लोणंद पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
याबाबत तिथून मिळालेल्या माहितीनुसार, नांदल येथील गट नंबर 653/3 मध्ये कोळेकर यांच्या पत्नीच्या नावावर एक एकर शेती असून त्यामध्ये 13 महिन्यांचा आडसाली ऊस उभा होता.
अचानकपणे लागलेल्या आगीत संपूर्ण ऊस जळून खाक झाला. केवळ ऊसच नव्हे तर शेताच्या कडेला ठेवलेले पीव्हीसी पाईपही आगीत जळाल्या सदर आगीचे कारण स्पष्ट झाले नसून, कोणत्याही प्रकारचे विद्युत कनेक्शन नसल्यामुळे शॉर्टसर्किटची शक्यता नाही त्यामुळे ही आग कोणीतरी जाणूनबुजून लावल्याचा संशय कोळेकर यांना आहे याप्रकरणी लोणंद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.