फलटण चौफेर दि ३ जुलै२०२५
श्रीमंत निर्मला देवी प्राथमिक विद्यामंदिर, फलटण विद्यार्थ्यांचा दिंडी सोहळा नुकताच सकाळच्या प्रसन्न वातावरणात विद्यार्थ्यांचा दिंडी सोहळा संपन्न झाला. या दिंडी सोहळ्यासाठी शाळेच्या व्हा. चेअरमन सौ वसुंधरा राजीव नाईक निंबाळकर, स्कूल कमिटीच्या सदस्या सौ. नूतन अजितराव शिंदे, स्कूल कमिटी सदस्य नितीन गांधी, शिरीष भोसले, चंद्रकांत पाटील, ज्ञानेश्वर देशमुख तसेच फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी अरविंद निकम सर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा प्रितम लोंढे बहुसंख्य पालक विद्यार्थी हजर होते.
विध्यार्थी वारकरी पोशाखात सहभागी झाले होते पोलीस,फुगेवाले, पान फुल बुक्का वाले, तसेच ज्ञानेश्वर मुक्ताई, विठ्ठल रुक्मिणी रूपात व वीणेकरी, तुळशी घेऊन , भगवे झेंडे घेऊन सहभाग होता.टाळ मृदंग वाजवत विद्यार्थ्यांनी विठ्ठलाचे भजन गायन केले.दिंडीचे मुख्य आकर्षण होते गोल रिंगण. यामध्ये सामाजिक प्रबोधन पर वेगवेगळे संदेश देण्यात आले. कमिन्स कंपनीच्या माध्यमातून सायबर सेफ संदेश,शिक्षकांच्या मार्गदर्शनाने स्वच्छता संदेश ,साक्षरता संदेश ,बेटी बचाओ संदेश ,वृक्ष संवर्धन संदेश इत्यादी गोष्टींवर विद्यार्थ्यानी संदेश फलक घेऊन परिसरात पायी वारी केली .गोल रिंगण करून घोड्याची प्रतिकृती द्वारे गोल फिरत पालक व मान्यवरांना संदेश देत पालखीला अभिवादन करत सामाजिक बांधिलकी जपली .हे नाविन्यपूर्ण गोल रिंगण या सोहळ्याचे खास आकर्षण ठरले. विद्यार्थीनीनी विठ्ठल भक्ती गीतावर नृत्य सादर केली.
मान्यवरांकडून व पालकांकडून याचे खूप कौतुक झाले.यानंतर विठू नामाच्या गजरात शालेय परिसरात शिक्षक व विद्यार्थी यांच्या फुगड्या व गाणी सादर करत आनंद लुटला. शाळेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिंदे मॅडम यांनी केले. दिंडी सोहळ्यात शाळेतील विद्यार्थी , सर्व शिक्षकवृंद, पालक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी मुख्याध्यापक सौ.वैशाली जाधव यांचे नियोजनाने मोठ्या उत्साहाने कार्यक्रम पार पाडला.